अकोला :- २० ऑक्टोंबर रोजी बार्शीटाकळी तालुक्यातील पोलिसांनी लोहगड व जामवसु गावांमध्ये छापा मारून अवैधरित्या हातभट्टीवर दारू बनविणाऱ्या अड्ड्यावर छापा मारला.यावेळी १ लाख २४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला मिळालेल्या माहितीनुसार , पोलिसांनी गुप्त पद्धतीने त्या गावातील सुभाष राठोड यांच्या घरी छापा टाकला,त्यांच्या घरून त्यांना दारू काढण्याचे साहित्य मिळाले
त्यांनी गावाजवडील जामवसु शिवारामध्ये धाड टाकली असता शंकर तांबरे यांच्या शेतामध्ये दारू बनविण्याचे साहित्य व दारूगाळणी मिळाली. हे साहित्य जप्त करून १ लाख २४ हजाराच्या मुद्देमाल जप्त केला. या आरोपी विरुद्ध बार्शीटाकडे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.