अकोला :- २० ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यामधील सर्व पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी व वाहतूक अंमलदारांनी आकस्मिक नाकाबंदी करण्यात आली, नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यात पोलिसांनी २ हजार ११२ वाहने तपासली असता त्यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंड ठोकण्यात आला.
दिवाळी व विधानसभा निवडणुकीच्या काळात पोलिसांनी अधीक्षकाच्या आदेशामुळे जिल्ह्यात आकस्मिक नाकाबंदी करण्यात आली, या दरम्यानच्या वाहन चालकांनी मद्यपान करून ड्रायव्हिंग केली व लायसन्स नसताना गाडी चालवली अशावर कार्यवाही करण्यात आली.
तसेच यामध्ये बिना नंबर प्लेटची गाडी चालवताना, मोबाईलवर बोलणारे व्यक्ती, फॅन्सी नंबर प्लेट लावणारे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे अशीच कार्यवाही पोलीस प्रशासन सुरू ठेवणार असा इशारा पोलीस अधीक्षकाने दिला आहे.