अकोला :- २६ ऑक्टोबर रोजी अकोल्यामधील मूर्तिजापूर येथे पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय विवाहितेने केलेल्या तक्रारीनुसार पती विशाल अनभोरे, सासू प्रमिला अनभोरे व सासरे बाबाराव अनभोरे हे सतत चारित्र्यावर संशय घेत. व तुझ्या वडिलांची शेती विकून पैसे आणून दे नाहीतर तुझ्या जीवाचे बरे वाईट झाल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी देत,
हे तिघे मिळून सतत त्रास देत होते व २८ जानेवारी २०२२ पासून ते ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत यांनी शारीरिक व मानसिक छळ केला.पती सतत शिवीगाळ करून मारहाण करायचा यादरम्यान पिडीतेने त्वरित शहर पोलीस स्टेशन गाठून २६ ऑक्टोबर रोजी या तीन आरोपीविरुद्ध बीएनएस कलम ४९८ अ ३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला, व पुढील तपास प्रक्रिया ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.