अमरावती :- १० नोव्हेंबरला अशोक नगर येथे राहणाऱ्या २४ वर्षीय पतीला पत्नी व सासऱ्याने मारहाण केली, मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराचे नाव चेतन डोंगरे हा रविवारला संध्याकाळच्या वेळेस झोपला होता. तेव्हाच अचानक त्याच्या मोबाईलवर कॉल आला चेतनच्या पत्नीने कॉल उचलल्यानंतर तिकडून सुद्धा महिला बोलत होती,
ही गोष्ट ऐकून चेतन लगेच जागा झाला.चेतनने पत्नीला मोबाईल मागितल्यानंतर पत्नीने मोबाईल देण्यास नकार दिला व पत्नी म्हणून लागली आधी ही कोण आहे ते सांग असे म्हणत पतीला शिवीगाळ केले व चावा सुद्धा घेतला.या दोघांचे भांडण ऐकून शेजारी राहणारे सासरा धावत आला व त्याने एक मोठी काठी उचलून चेतनच्या डोक्यावर मारली,
यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याने त्वरित रात्रीच्या वेळेस तिवसा पोलीस स्टेशन गाठून पत्नी व सासरा राजेश हुके यांच्यावर गुन्हा नोंदवला.नंतर पत्नीने तिवसा पोलीस ठाण्यात जाऊन पतीविरुद्ध तक्रार दाखल केली, पत्नीने तक्रारी मध्ये पती चेतन डोंगरे याचे विवाहबाह्य दुसऱ्या महिलेची संबंध असल्याचे सांगितले.
पती हा नेहमी भांडण करतो मारहाण पण करते त्यामुळे न्यायालयात प्रकरण सुरू आहे, त्याच्या मोबाईलवर एका अज्ञात महिलेचा कॉल आला. व ती १० हजार रुपये मागत होती म्हणून चेतनला झोपेतून उठवले व ही अज्ञात महिला कोण असे विचारताच त्याने मारहाण केली, त्यामुळे बचावासाठी त्याच्या हाताला चावा घेतला हे भांडण ऐकून वडील भांडण सोडवण्यासाठी धावून आले, त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली, असे चेतनच्या पत्नीने तक्रारीत नमूद केल्यामुळे तिवसा पोलिसांनी चेतनविरुद्ध गुन्हा दाखल केला.
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
बुलढाणा:- विधानसभा निवडणुकीत मोबाईल बंदी असतानाही नागरिकांनी मतदान कक्षात मोबाईल नेऊन व्हीव्हीपॅट वोटिंग मशीनच्या चित्रफिती…
वाशिम:- वाशिम मधील बाजारात सोयाबीनचे दर निवडणुकीनंतर वाढतील अशी सर्व शेतकऱ्यांची आशा होती, पण निवडणुकीनंतर…
अमरावती:- २१ नोव्हेंबर रोजी दुचाकी घसरल्यामुळे १ च्या सुमारास खेडनजीक गावातील अपघातात ६४ वर्षीय इसमाचा…
वर्धा:- सायबर फसवणुकीपासून सावधान रहा असे आवाहन जिल्हा पोलीस व सायबर सेल विभागाने केले आहे,…
चंद्रपूर (सास्ती) : राजुरा तालुका पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मजूर…
This website uses cookies.