बुलढाणा:- चुकीच्या खात्यात किंवा ऑनलाईन पैसे गेल्यानंतर ते पैसे मिळण्याची थोडीशी ही शाश्वती नसते.पण मलकापूर येथील व्यापारी किशोर अग्रवाल यांना एका व्यक्तीला तीन लाख रुपये पाठवायचे होते परंतु ते चुकीने दुसऱ्याच्या खात्यावर गेले. किशोर अग्रवाल यांनी ताबडतोब सायबर पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली,
पोलिसांनी एनसीसीआरपी पोर्टलवर तंतोतंत माहिती अपलोड केली. व ज्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे गेले त्या खातेदाराशी संपर्क साधून त्यांना सांगण्यात आले.व २३ सप्टेंबरला पूर्ण रक्कम प्राप्त झाली जर कोणत्याही व्यक्तीशी फ्रॉड किंवा चुकी झाली, तर एनसीसीआरपी पोर्टलवर माहिती नोंदवावी असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.