अमरावती:-१ ऑक्टोबरला अमरावती मधील मोर्शीमध्ये शिंदी फाट्यावर पोलिसांनी पिस्टल घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना अटक केली.त्यांच्याकडून देशी बनावटीचे बंदूका व दोन जिवंत कारतूस मिळाले व एलसीबी परतवाडा येथुन सुध्दा देसी बंधूक व कारतूस जप्त करण्यात आली, या घटनेची कारवाई २ ऑक्टोंबर ला करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मोर्शी पोलीस ठाण्याचे पथक मोर्शी स्टेशनमध्ये येणाऱ्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना राजेश भादा यांच्या घरी देसी बंधूका असल्याची माहिती मिळाली, त्यांनी आरोपी राजेश भादा यांच्या घरी धाड पाडली असता तिथून २५ हजाराच्या देसी बंदुका मिळाल्या. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
व दुसऱ्या ठिकाणी पेथ्रोट मध्ये आरोपी सादिक खान साबीर खान (२९) हा देशी पिस्टल सोबत घेऊन फिरायच्या या घटनेची माहिती एलसीबी ला होत असताना आरोपीला सिंदि फाट्यावर अडवून झडती घेतली त्याच्याकडून देशी बंदुका व काडतुसे दिसून आल्या, आरोपी विरुद्ध पेट्रोल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला या घटनेची पाहणी स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख किरण वानखेडे व इतर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात झाली.