अमरावती :- ३१ ऑक्टोंबरला एका ५९ वर्षीय व्यक्तीचा मोबाईल चोरून तिथून ऑनलाईन बँकिंग प्रणालीचा उपयोग करून एक लाख ७ हजार रुपये केले लंपास या घटनेची माहिती होतास दत्तविजय महले यांनी ४ नोव्हेंबरला अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तविजय महाले हे सकाळी मोची गल्लीतील परिसरामध्ये फिरायला गेले असता, एका अज्ञात व्यक्तीने मोबाईल चोरी केला या घटनेची त्वरित तक्रार महले यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात केली. त्यांनी एटीएम मध्ये पैसे चेक केले असता त्यांना तीन लाख ५१ हजार ३७६ रुपये शिल्लक दिसले, दिवाळी असल्यामुळे त्यांनी आपल्या खात्याकडे लक्ष दिले नाही व दिवाळीत व्यस्त झाले.
त्यादरम्यान त्यांच्या मुलाने २ नोव्हेंबरला चोरी केलेल्या मोबाईलवर कॉल केले असता, मोबाईलची रिंग गेली त्याने इंटरनेटवर चेक केले असता खात्यातून पैसे ट्रान्सफर झाल्याचे कळले दत्तविजय महले हे आणखी एटीएम मध्ये पैसे चेक करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना त्यांच्या खात्यातून एक लाख ७ हजार रुपये ट्रान्सफर झाल्याचे दिसले महले यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.