अमरावती: अंजनगाव सुर्जी येथे केळीचे कॅरेट ट्रक वाहून नेत असताना ३ आक्टोंबर च्या दिवशी दुपारी ४ वाजता टायर फुटून ट्रक उलटला. या प्रकरणांमध्ये दोन मजूर गंभीर जखमी झाले होते ,या ट्रकचालक अल्पवयीन असल्यामुळे परवानाधारकाने दुसऱ्या ट्रकचा चालक पोलिसांच्या सामोर उपस्थित केला.ही माहिती ट्रक मधीलच एका मजुराने नाव न सांगण्याच्या अटीवरून दिली. अचलपूर येथून केळीचे ट्रक (एम एच ४८ – एजी ५२६७) अंजनगाव सुजीऀला राइपनिंग सेंटरवर नेले जात होते.
जवळापूरच्या कॅनलजवळ ट्रक आल्यानंतर अचानकपणे ट्रकच्या टायर फुटला. व रस्त्यावर उलटला तेथील उपस्थित सहा मजूर पडले, व अनिल नावाच्या मजूर जास्त जखमी झाला. त्यामुळे त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले तेव्हाच गाडीच्या मालकाने अल्पवयीन चालकाला लपवून आयुब खान शमशाद या ट्रक ड्रायव्हरला त्याच्या ठिकाणी उपस्थित केले, आयपीएस अधिकारी शुभम कुमार हे अपघात स्थळी जात असताना थांबून पूर्ण माहिती घेतली.