अमरावती:- १५ ऑक्टोबरला मोर्शी मध्ये एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला गर्भधारणा झाली.एवढे झाल्यानंतर आरोपी अब्दुल रउफ अब्दुल खलील याने लग्नाला नकार दिल्यामुळे मोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही मजुरीला जात असायची, तिथे दोघांची ओळख झाली ओळखीतून बोलचाल व मैत्रीचे संबंध निर्माण झाले. आरोपी अब्दुल याने मी तुझ्यावर प्रेम करतो मला तुझ्याशी लग्न करायचे आहे,
असे बोलून लग्नाचे आमिष दाखवले व आरोपीने तिला एका ठिकाणी नेऊन जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी पीडिता १७ वर्षाची होती त्यानंतर पिडीता गर्भवती असल्याची माहिती अब्दुल ला देण्यात आली.
मात्र आरोपीने लग्न करण्यास नकार दिला, पिडीतेने त्वरित पोलिसाकडे धाव घेतली व गुन्हा नोंदवला पोलिसांनी आरोपीला अटक केली व न्यायालयात हजर केले.