अमरावती :- अमरावतीमधील बडनेरा मध्ये चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी संशयित आरोपीचे घर गाठून घराची तपासणी केली असता आरोपीकडे चोरी केलेले २० मोबाईल व एक दुचाकी मिळाली. हा मुद्देमाल पोलिसांनी गुरुवारला जप्त केला , पोलिसांनी त्याच्यावर कार्यवाही करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांच्या माहितीप्रमाणे मिळालेले चोरीचे सामान हे २ लाख २२ हजाराचे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विक्रम उर्फ बाळू (२४) हे आरोपीचे नाव आहे, २४ ऑगस्टला मंगेश ठाकरे यांनी दुचाकी चोरी केल्याची तक्रार धामणगाव पोलिसांमध्ये नोंदवली, पोलिसांनी आरोपीची तपास घेत घरी छापा मारला असता त्यांना त्याच्या घरून विविध कंपन्याचे २० मोबाईल व एक दुचाकी मिळाली.असा एकूण २ लाख २२ हजाराच्या मुद्देमाल मिळाला,२४ ऑक्टोंबर ला पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर कार्यवाही करण्यात आली.