अमरावती :- २७ ऑक्टोंबर रविवारला दुपारच्या वेळेस रोटाव्हेटर लावलेला ट्रॅक्टर शेतातून काढून रस्त्यावर आणला व गावाकडे ट्रॅक्टर निघाले त्यादरम्यान ट्रॅक्टर मध्ये तीन व्यक्ती होते, ट्रॅक्टर चालत असतांना रोटाव्हेटरचा नट निसटला व ट्रॅक्टरचे संतुलन बिघडले त्यामुळे दोघेजण ट्रॅक्टर खाली दबले व एक व्यक्ती उसरून दूर पडला, ट्रॅक्टर खाली दबलेल्यांचा जागीच मृत्यू झाला व एक व्यक्ती गंभीर जखमी असून अमरावती येथे उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल सांगोले (३१), प्रेमलाल धूर्वे (३२) यांचा मृत्यू झाला, व राम उईके हा गंभीर जखमी आहे. तळवेल गावातील हरीश बोंडे यांनी ब्राह्मणवाड्यामध्ये शेती कसण्यासाठी घेतली होती त्यांनी २७ ऑक्टोबरला स्वतःच्या ट्रॅक्टर शेतात रोटाव्हेटर करण्यासाठी विशाल सांगोले ला सांगितले, विशालने सोबतीसाठी गावातीलच दोन मजूर प्रेमलाल धुर्वे , व राम उईके यांना घेतले. दुपारला दोनच्या सुमारास शेतातले काम संपले व तिघेही घरी जाण्यासाठी निघाले,
शेतातून ट्रॅक्टर रस्त्यावर आणले थोड्या अंतरावरच रोटावेटर चा नट निघाला व टायरमध्ये गेला याने ट्रॅक्टरचे संतुलन बिघडले, राम हा दूर उसरला व विशाल आणि प्रेम ट्रॅक्टर खाली दबले.या घटनेची माहिती मिळताच नागरिकासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्वरित तिघांना रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले तर एकावर अमरावती रुग्णालयात उपचार सुरू आहे.