अमरावती :- शनिवारला मोर्शी मधील वर्धा नदीच्या काठावर राज्य उत्पादन शुल्क शाखेच्या अधिकाऱ्यांनी दारू निर्मिती कारखान्यावर छापा मारला, व ४ लाख ३८ हजाराच्या मुद्देमाल नष्ट केला. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाला या कारखान्याची गुप्त माहिती मिळाली या अधिकाऱ्यांनी छापा मारला असता हातभट्टी दारूच्या कारखाना आढळला, या कारखान्यामधून लोखंडी ड्रम, ७६०० किलो गुड, ३०० लिटर हाताने बनवलेली दारू, रसायन, प्लास्टिक ड्रम आणि ॲल्युमिनियमचे घमेले जप्त केले.
या कारखान्यातील मुख्य आरोपी महिला हिच्या घरी छापा मारला असता, ८ लिटर दारू, १४८० किलो दारू, भट्टीचा गुड व हातभट्टी दारू मिळाली.या दोन्ही ठिकाणी छापा मारला असता ४ लाख ३८ हजाराच्या मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.या जप्त मुद्देमालापैकी द्रव्य पदार्थ दारू नष्ट करण्यात आली, या कारखान्याचे मुख्य महिला (बोरगाव धर्माळे) हिच्यावर कायद्यान्वये कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात आला.