गोंदिया : या जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये राहणाऱ्या मायलेकीचा, अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार प्रकृती बरी नसल्याने त्या इटखेडा येथे डॉक्टरांकडे गेल्या होत्या ,तेव्हा हा अपघात झाला. हा अपघात वडसा कोहमारा या राज्यमार्गावर घडला. दिपाली अनिल डोंगरवार (३३)व निर्मला योगराज कापगते( ६०),असे या अपघातात मृत पावलेल्या मायलेकीचे नाव आहे.
धडक दिल्यानंतर अज्ञात वाहन तिथून पळून गेले, गोंदिया येथील अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये राहणाऱ्या मायलेकीचा, अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार प्रकृती बरी नसल्याने त्या इटखेडा येथे डॉक्टरांकडे गेल्या होत्या ,तेव्हा हा अपघात झाला. हा अपघात वडसा कोहमारा या राज्यमार्गावर घडला. दिपाली अनिल डोंगरवार (३३)व निर्मला योगराज कापगते( ६०),असे या अपघातात मृत पावलेल्या मायलेकीचे नाव आहे.
धडक दिल्यानंतर अज्ञात वाहन तिथून पळून गेले, त्यामुळे पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. व या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.धडक दिल्यानंतर अज्ञात वाहन पळून गेले. यात दोघी मायलेकींचा मृत्यू झाला. त्यामुळे अनिलकुमार तेजराम डोंगरवार (४१) खामखुरा यांच्या फिर्यादीवरून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कलम १०६ (१), २८१ भारतीय न्यायसंहिता, सह कलम १८४,१३४ मोटार वाहन कायदा नुसार गुन्हा नोंदविला आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक रोहनकर हे करीत आहेत