यवतमाळ:-१६ नोव्हेंबरला एका अल्पवयीन मुलीला आरोपीने पळवून नेल्यामुळे मुलीच्या काकानी खंडाळा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या शोध घेऊन हैदराबाद येथून आरोपीला अटक केली.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाचे नाव सय्यद शाकिब सय्यद सलीम (२२) आहे .
अल्पवयीन मुलगी १६ नोव्हेंबरच्या रात्री दीड लाखाची रोख रक्कम घेऊन गेली, या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी खंडाळा पोलिस स्टेशनमध्ये सय्यद शाकिब सय्यद सलीम या आरोपी मुलाने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार केली.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून या दोघांचा शोध घेणे सुरू केले ,त्यांना आरोपी व मुलगी हैद्राबाद येथे असल्याचे माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांनाच घेऊन हैदराबाद येथे गेले.
आरोपी मुलगा हा एका ठिकाणी मिस्त्री काम करत होता पोलिसांनी तिथेच त्याला अटक केली व मुलगी रेल्वे स्टेशनवर मिळाली. पोलिसांनी मुलीलाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्यानंतर कुटुंबीयांना देण्यात आले. या प्रकरणाची पुढील तपास उपनिरीक्षक देवानंद कायदे करीत आहेत.
अल्पवयीन मुलीला व आरोपीला अटक
पोलिसांनी अल्पवयीन मुलीला रेल्वे स्टेशन वरून ताब्यात घेतले, तर आरोपी हा हैदराबाद येथे मिस्त्री काम करत असतांना तेथून त्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली.