बुलढाणा:- १७ नोव्हेंबरला अवैध गुटखा व सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह ३९ लाख ६९ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल दुपारला २ च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील एमआयडीसी चौकामधून दसरखेड पोलिसांनी जप्त केला.मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना एका वाहनाला थांबवले व विचारपूस केली त्याने उत्तर समाधानकारक न दिल्यामुळे कंटेनर ची पाहणी केली.
प्लास्टिकच्या पॅकिंग मध्ये पोतळ्या आढळून आल्या राज्यांमध्ये बंदी असलेला गुटखा व सुगंधित पान मसाला आढळला.इतर पंचासमोर पाहणी केल्यानंतर २५ लाख १९ हजार ४०० रुपयांचा गुटखा, तसेच वाहन मिळून अंदाजे १४ लाख ५० हजार असा पूर्ण एकूण ३९ लाख ६९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, याप्रकरणी पुढील कारवाई पोलीस पथकाने केली.
अवैध गुटखा हा दसरखेड एमआयडीसी चौकात एमपी-जीजी-२९०० या वाहनातून मिळाला आरोपीचे नाव अन्वर नवाब मुलतानी याला पोलिसांनी अटक केली, ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमराज कोळी, पोहेकाॅ, राजेश बावणे, सतीश वैदकर इत्यादी पथकाने केली.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.