Chandrapur

आईचा अचानक मृत्यू झाल्याने, लेकीनेही घेतला गळफास

घुग्घुस : आईचा अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने
मृत्यू झाल्याने शोकाकुल अल्पवयीन लेकीने खोलीची आतील कडी लावून पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गायत्री श्रीनिवास कादासी (१६, रा. रामनगर) असे मृतक मुलीचे नाव आहे.ही दुर्दैवी घटना रविवारी (दि. १७) पहाटे उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, घुग्घुस येथील रामनगर वेकोलि वसाहतीत श्रीनिवास कादासी यांचे कुटुंब राहते. कादासी यांच्या पत्नी तिरुमला (४२) हिला शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना वेकोलिच्या राजीव रतन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूरला नेत असताना रात्री १.३० वाजता तिचा वाटेतच मृत्यू झाला.

आईचा मृतदेह घरी आणल्याचे पाहून मुलगी गायत्रीने हंबरडा फोडला. यादरम्यान ,कुटुंबीय व नातेवाइकांनी तिला धीर देत घरातील खोलीत आराम करण्यास नेले असता, व सोबतचे नातेवाईक खोलीतून बाहेर निघाल्यानंतर गायत्रीने आतून कडी लावून घेतली होती . त्यामुळे शोकाकुल सर्व कुटुंबीय रात्रभर मृतदेहाशेजारी जागरण करीत होते.

आईचा अचानक मृत्यू झाल्याने, लेकीने गळफास घेतल्याने शहरात शोकाकुल वातावरण:

त्यानंतर गायत्री खोलीत झोपी गेली असावी, असे सर्वांना वाटत होते . त्यामुळे कुणीही तिला रात्री उठविण्याचा प्रयत्न केला नाही. पहाटे ४.३०च्या सुमारास दार ठोठावले असता आतून काही प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी दार खोलून पाहिले असता, गायत्रीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला. आज दुपारी माय व लेकीवर एकाचवेळी शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आला. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Vidarbha Trends Team

Recent Posts

तरुणाने लग्नापूर्वी ठेवले शरीरसंबंध

अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…

4 months ago

तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…

4 months ago

मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…

4 months ago

घराघरांवर क्युआर कोड लावले

अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…

4 months ago

रेशनच्या ई – केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…

4 months ago

विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा

यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…

4 months ago

This website uses cookies.