यवतमाळ :- निवडणुकीच्या काळामध्ये अनेक प्रकारे आर्थिक देवाण-घेवाण होत असते. आणि उमेदवार मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार करत असतात निवडणुकीत आर्थिक आमिषे देऊन वातावरण निर्मित केले जाते.
नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया २२ ऑक्टोंबर पासून सुरू होत आहे, आचारसंहिता लागू झाली या काळात आयकर विभागाची यंत्रना ही सक्रिय झाली आहे. काही उमेदवार निवडणुकीच्या काळामध्ये काळा पैसा बाहेर काढतात व वेगवेगळ्या मार्गाने वितरित करून निवडणूक लढत असतात.
हा पैसा निवडणुकीत वापरला जाऊ नये यासाठी आयकर यंत्रणा सतर्क झाली आहे. अशा प्रकारचा पैसा कुठे वितरित होत असेल किंवा हलविले जात असेल तर टोल फ्री क्रमांक १८००२३३०३५५, १८००२३३०३५६ या क्रमांकावर तक्रार करू शकता जो व्यक्ती अशा प्रकारची माहिती देईल त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.