वैरागड (गडचिरोली): प्रेमसंशय असल्याने मारहाण केल्यास मुलीने विष प्राशन केले. याचे कारण म्हणजे चिकन सेंटर चालक प्रशांत विश्वनाथन भोयर याच्याशी तिचा प्रेम संबध असल्याचे संशय त्याचा घरच्यांना आले. त्यामुळे संशयावरून त्याची पत्नी, आई व वहिनीने
अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन मारझोड केली. हा अपमान मुलीच्या जिव्हारी लागला. म्हणून तिने विष प्राशन केले. व उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. ही घटना आरमोरी तालुक्याच्या कुकडी येथे ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता शनिवारी घडली.
शिवानी फकीरदास कोवे (१७, रा. कुकडी, ता. आरमोरी) असे मृत मुलीचे नाव आहे. शिवानी ही विहीरगाव येथील यशवंत कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ व्या वर्गात शिकत होती. विहीरगाव येथीलच चिकन सेंटर चालक प्रशांत विश्वनाथ भोयर यांच्याशी तिचे प्रेम असल्याचा संशय प्रशांतची पत्नी शिल्पा भोयर (२८), आई कल्पना भोयर (५५) आणि वहिनी अरुणा प्रफुल्ल भोयर (३३) यांना होता. प्रेमप्रकरणाच्या संशयातून त्यांनी गुरुवार, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास कुकडी गावात पोहोचून थेट शिवानीचे घर गाठले व तिला मारझोड केली.
घटनेच्या दिवशी शिवानीचे आई-वडील मजुरीसाठी दुसर्या जिल्ह्यात गेले होते.शिवानीची आजी शेतावर गेली होती, तर लहान बहीणसुद्धा घरी नव्हती. तेव्हा डाव साधून तिन्ही महिलांनी शिवानीशी जोरजोरात भांडण करून तिला खोलीत डांबून मारझोड करीत धमकीसुद्धा दिली.
शिवानीला मारझोड करताना कुणीही अटकाव केला नाही. मारझोडीनंतर तिन्ही महिला विहीरगाव येथे निघून गेल्या.
झालेले आरोप व अपमान शिवानीच्या जिव्हारी लागला. शेजाऱ्यांनी तिला आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. तेथे उपचार सुरू असतानाच शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता तिचा मृत्यू झाला. शिवानीने घरीच उपलब्ध असलेले उंदीर मारण्याचे विष प्राशन केले. काही वेळेतच तिची प्रकृती बिघडायला लागली.
याप्रकरणी तिन्ही महिलांवर आरमोरी पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झालेला आहे.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.