गडचिरोली : गडचिरोली येथील आरमोरी वनपरिक्षेत्रातील इंजेवारी बीटात 20 लाख रुपये खर्च करून बांधलेला बंधारा अवघ्या चार महिन्यातच वाहून गेला .त्यामुळे बांधकामाच्या दर्जावर नागरिकांनी प्रश्न उभा केला .
मे महिन्यामध्ये आरमोरी वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या बीटात ,जिल्हा वार्षिक निधीतून हा बंधारा बांधण्यात आला होता .
उन्हाळ्यामध्ये जंगलात राहणाऱ्या वन्यजीवांसाठी पाण्याची सोय व्हावी ,त्यांना पाणी पिण्यासाठी भटकंती करायला नको यासाठी हा बंधारा बांधला होता .
परंतु 20 लाख रुपये खर्च करून सुद्धा हा बंधारा चार महिन्यानंतर फुटला आहे .आणि पाणी वाया गेले आहे .त्यामुळे कामाच्या गुणवत्तेची चौकशी करून संबंधित कंत्राटदारांवर आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.