Chandrapur

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया झाली सुरु

चंद्रपूर : या जिल्हयामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने मतदानासाठी ईव्हीएममध्ये, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.लगीन घरी ज्या पद्धतीने तयारी असते, अशीच तयारी सध्या प्रशासनाच्या वतीने निवडणुकीची केली जात आहे.

यासोबतच सगळे उमेदवारसुध्दा प्रचारामध्ये गुंतलेले आहेत , त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांची लगबगसुध्दा वाढली आहे. त्यासाठी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट तयार करण्यासाठी ३० टेबल लावले असून, ९० कर्मचारी, मशिन सज्ज करण्यात गुंतलेले आहे.चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात ३९० मतदान केंद्र आहे. या मतदारसंघासाठी ९३६ बॅलेट युनिट, ४६८ कंट्रोल युनिट आणि ५०३ व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात मशिन तयार करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयात रविवार करण्यात आली. यासाठी तहसील कार्यालयाच्या परिसरात मंडपसुध्दा उभारण्यात आला आहे.

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील ३९० मतदान केंद्रासाठी असलेल्या ईव्हीएमपैकी ५ टक्के म्हणजे १९
मशिन मॉक पोलकरिता रैंडम पद्धतीने निवडण्यात आल्या. प्रत्येक मशिनवर एक हजार याप्रमाणे दोन दिवसांत १९ मशिनवर १९ हजार मॉक पोल घेण्यात येणार आहे.

रविवारी मॉक पोल प्रसंगी चंद्रपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सीमा गजभिये, नायब तहसीलदार ईव्हीएम मतदान यंत्र व्यवस्थापन राजू धांडे, रवींद्र भेलावे आदी उपस्थित होते.

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया :

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया ही उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींसमोर केली जाते. यात मतपत्रिका बॅलेट युनिटला लावून सील करणे, प्रत्येक उमेदवाराला मतदान करून बघणे (मॉक पोल), मतदान झाल्यानंतर व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठया आणि ईव्हीएमचा डेटा जुळवून बघणे. त्यानंतर कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट सील करून स्ट्रॉग रूममध्ये ठेवण्यात येते. प्रत्यक्ष मतदानाच्या एक दिवस अगोदर मतदान पथकाला मशिनचे वाटप केले जाते .

Vidarbha Trends Team

Recent Posts

तरुणाने लग्नापूर्वी ठेवले शरीरसंबंध

अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…

4 months ago

तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…

4 months ago

मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…

4 months ago

घराघरांवर क्युआर कोड लावले

अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…

4 months ago

रेशनच्या ई – केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…

4 months ago

विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा

यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…

4 months ago

This website uses cookies.