उदयनगर: अमडापूर आणि उदयपूर मध्ये चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडली पाच दुकाने या दुकानांमधून ४६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी घडली.
व अमडापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच उदयपुर आणि अमडापूर परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत.२९ सप्टेंबरच्या रात्री प्रभात किराणा स्टोअर्स मधून आठ हजार पाचशे रुपये, त्रिमूर्ती जनरल स्टोअर्स मधून १२ हजार आणि गजानन मोटर रिवायडींग मधून १३ हजार ५०० रुपये व कृषी भूषण एजन्सी हार्डवेअरच्या दुकानातून चोरट्यांनी २ हजार ७०० रुपये चोरी केले. तसेच उदयनगर मधील देशी दारूचे दुकान फोडून दहा हजार रुपये चोरी केले.
चोर त्यांनी एकूण ४६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणाची तक्रार अमडापूर पोलीस स्टेशनला केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला, नागरिकांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे .या प्रकरणाची पुढील तपास ठाणेदार निर्मळ व उपनिरीक्षक युवराज राठोड करीत आहे.