बुलढाणा:- २२ ऑक्टोंबर पासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात होत आहे, उद्या ११ ते ३ वाजता पर्यंत ज्यांना – ज्यांना उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहे त्यांना अर्ज करता येणार, अर्ज दाखल करण्याची मुदत २९ ऑक्टोबर पर्यंत दिली आहे.विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांमध्ये व पक्षामध्ये हलचल वाढल्या आहेत, अनेक उमेदवार उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
अनेकांच्या कागदपत्राविषयी संभ्रम होत आहे काही उमेदवार हे पक्षात तर काही उमेदवार अपक्षात निवडणूक लढणार असल्याचे चित्र बघायला मिळते. अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज दाखल करावे उमेदवारी नामनिर्देशन पत्र विहित नमुना भरावा, मतपत्रिकेवर नाव कसे असावे याबाबत लेखी पत्र द्यावे, दंडाधिकारी – नोटरी यांच्या स्वाक्षऱ्याकडून सादर करावा अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.