अकोला:- २ नोव्हेंबरला रात्री अमरावती – कारंजा मार्गावर रात्रीच्या वेळेस उभ्या असलेल्या बसला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या खाजगी बसणे धडक दिली, यात चार जण गंभीर जखमी झाले व बस चालकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, अमित मुंदडा यांच्या ट्रॅव्हल्सच्या कंपनीमध्ये बस चालक म्हणून कार्यरत होता,
त्याच्यासोबत दुसरा बस चालक श्रीधर तायवडे हा २ नोव्हेंबरला रात्री नागपूरवरून पुणे ला खाजगी बस घेऊन जात असताना अमरावती कारंजा मार्गावर बळीराजा हॉटेल समोर बसचे टायर फुटले, त्यामुळे त्यांनी रस्त्याच्या कडेला बस उभी केली व मोबाईलच्या टॉर्चने टायर बदलवित होते. त्याच्या दुसऱ्या दिशेने खुराणा ट्रॅव्हल्स ची बस भरधाव वेगाने आली
व उभ्या असलेल्या बसला जोरदार धडक दिली, या अपघातात टायर बदलवित असणारा चालक श्रीधर तायवाडे याच्यासह दोन-तीन प्रवासी गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती होताच नागरिकांनी या चार ही जखमींना रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान बस चालक तायवाडे याचा मृत्यू झाला व अन्य प्रवासी गंभीर जखमी आहेत.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.