Washim

कारच्या अपघातात महिला जखमी

वाशिम:- १७ नोव्हेंबरला ४:३० वाजता कारच्या अपघातात महिला गंभीर जखमी झाली, कार रस्त्यावरून जात असतांना अचानक कारसमोर दुचाकी आल्याने कार ड्रायव्हरने दुचाकी वाचवण्याच्या नादात प्रवासी निवार्‍याला कारची धडक लागली. ही घटना रिसोड मार्गावरील मोरगव्हाण फाट्यावर घडली, या प्रकरणात एक महिला गंभीर जखमी झाली व एक अन्य व्यक्ती किरकोळ घायल झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, एक कुटुंब लोणार कडून नांदेडकडे येत होते मोरगव्हाण फाट्याजवळ आल्यानंतर या कुटुंबाच्या कारच्या समोर एक दुचाकी आडवी आली, त्या दुचाकिला वाचविण्याच्या नादात कार चालकाची धडक तेथील प्रवासी निवार्‍याला लागली. या अपघातामध्ये कारमध्ये असलेली महिला निता काटे ही गंभीर जखमी झाली,

तर गोविंदा दंडारे हे किरकोळ जखमी झाले. ही घटना घडताच दुचाकिस्वार पळ काढत निघाला, या घटनेची माहिती होताच गावकरी धावुन आले. व जखमींना कार ने रुग्णालयात उपचारासाठी नेले.

कारच्या अपघातात झालेले जखमी

रिसोड – लोणार मार्गावरून कार मोरगव्हान फाट्यावर आल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्यात कारची धडक प्रवासी निवार्‍याला लागली, ही कार २६ बीएक्स ३६०९ क्रमांकाची असून यामध्ये असलेली महिलाही गंभीर जखमी झाली, व गोविंद दंडारे हे किरकोळ जखमी आहेत यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Vidarbha Trends Team

Recent Posts

मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांना धान कापणीच्या कामात अडचणीं

चंद्रपूर (सास्ती) : राजुरा तालुका पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मजूर…

18 hours ago

वृद्धाचा घरी परततांना अपघातात मृत्यू

अमरावती :- २० नोव्हेंबरला दोनच्या सुमारास ७५ वर्षीय वृद्धाचा मतदान करून घरी परतताना अपघातात मृत्यू…

19 hours ago

घरात मृत्यू झाला असतांना,घरच्यांनी केले मतदान

गोंदिया (अर्जुनी मोरगाव) : घरात पतीचा मृतदेह असतांना, कुटुंबात दुःखाचे सावट सर्वत्र पसरलेले असतांना, जन्मदात्याचे…

19 hours ago

खासगी बाजारात पांढऱ्या सोन्याची आवक

वाशिम :- खाजगी बाजारामध्ये पांढरा सोन्याची आवक वाढल्याचे दिसून येत आहे यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात…

20 hours ago

आरोग्य पथकाद्वारे जिल्ह्यात एकूण ४६ रुग्णांना देण्यात आली आरोग्यसेवा

गडचिरोली : निवडणूक कर्तव्यावर असलेले पोलिस पथक, निवडणूक कर्मचारी, अधिकारी हे रांगेत उभे असोत, किंवा…

20 hours ago

निवडणुकीचे काम आटोपल्यानंतर बससेवा सुरळीत

बुलढाणा:- २० नोव्हेंबरला निवडणुकीचे कामानिमित्त २६८ बसेस राखीव ठेवण्यात आल्या होत्या , त्यामुळे दोन दिवस…

21 hours ago

This website uses cookies.