वाशिम :- मानोरा येथील कालीऀ गावात गावठी दारू भट्टीवर मानोरा पोलिसांनी छापा टाकून ९१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून घटनास्थळीच नष्ट केला.मिळालेल्या माहितीनुसार, कालीऀ येथील शिवारात आरोपी साहेबराव पांडे यांच्या शेतात झोपडी आहे. त्या झोपडीतच साहेबराव याने दारूभट्टी उघडली.
मानोरा पोलिसांना या शेतातील गावठी दारूभट्टिची माहिती मिळताच त्यांनी शिवारात धाड टाकली , व तिथे पाहणी केली तेव्हा त्यांना ३ हजार रुपये किमतीची ३० लिटर दारू व ८३ हजार रुपये किमतीची गावठी दारू व मोह सळवा असलेले १५ लिटर असलेले ३७ टिनपत्र्याचे पिंप व ५ हजार रुपयाचे इतर साहित्य मिळुन एकुण ९१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल आढळला.
हा मुद्देमाल पोलिसांनी उपस्थित पंचासमक्ष जप्त करून नष्ट केला, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर कलम ६५ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली झाली.
कालीऀ येथे शेत शिवारात पोलिसांनी ३० लिटर दारू, ८३ हजाराची गावठी दारू, मोहसळवा व ३७ टिनपत्र्याचे पिंप व ५ हजार किमतीची इतर साहित्य मिळाले.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.