कोरपना : चंद्रपूर येथील कोरपना मध्ये स्कूल बस उलटल्यामुळे 25 विद्यार्थी जखमी झाले.मिळालेल्या माहितीनुसार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही स्कूल बस उलटली आणि हा अपघात झाला. ही बस गडचांदुर येथील लालबहादूर शास्त्री या विद्यालयाची होती . नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा मोठा अनर्थ टळला. ही घटना शनिवारी (दि.५) सकाळी ११:३० वाजता हरदोना बसस्थानक परिसरात घडली.
गडचांदूरातील लालबहादूर शास्त्री या विद्यालयाची ही बस होती. विद्यार्थ्यांना शाळेतून परत सोडण्यासाठी ही बस जात होती.या दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटले . हि स्कूलबस अंबुजा फाट्याजवळील हरदोना बसस्थानकावर मुख्य रस्त्यावर उलटली. हे दृश्य बघताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढून गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात भरती केले.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. प्रकृती स्थिर आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांची अधिक तपासणी करण्यासाठी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या घटनेचा पंचनामा पोलिसांनी केला आहे. व पोलिसांकडुन अपघाताचे कारण तपासले जात आहे. या अपघाताबाबत परिवहन विभागाला माहिती दिली असून, बसच्या तांत्रिक स्थितीची तपासणी केली जाणार आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.