बुलढाणा :- शुक्रवारला सायंकाळच्या वेळेस जलंब पोलिसांनी निवडणुकीसाठी गाड्यांची तपास सुरू केली, यादरम्यान पोलिसांना एका दुचाकीस्वाराकडून चार लाख ६७ हजार ३५० रुपयाची रक्कम जप्त केली. या रकमेच्या दुचाकी स्वाराकडे कोणत्याही प्रकारच्या पुरावा नसल्यामुळे ,
पोलीस पथकांनी ही रक्कम निवडणूक अधिकारी खामगाव यांना दिली.मिळालेल्या माहितीनुसार, जलंब पोलिसांनी निवडणुकीत कोणत्याही अवैध काम होऊ नये म्हणून शुक्रवारला नाकाबंदी केली या नाकाबंदी दरम्यान एक दुचाकीस्वार चार लाख ६७ हजार ३५० रुपये नेतांना दिसला पोलिसांनी या रकमेबद्दलची माहिती विचारली
तर युवक म्हणाला ही रक्कम पेट्रोल पंप वरली आहे. व हे रक्कम मी बँकेत जमा करायला जात असल्याचे सांगितले.या दुचाकी स्वाराकडे या रकमेचे कोणते प्रूफ नसल्यामुळे पोलिसांनी ही रक्कम निवडणूक अधिकाऱ्याकडे सुपूर्द केली, विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात अनेक पोलीस पथके तपासणीसाठी तैनात झाली आहेत.