वाशिम :- खाजगी बाजारामध्ये पांढरा सोन्याची आवक वाढल्याचे दिसून येत आहे यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात पडल्यामुळे शेतकऱ्यांना कापसाचे उत्पादन समाधानकारक झाले, शेतकऱ्यांनी कापसाचे वेचणी सुद्धा केली पण कापूस बाजारात नेल्यानंतर भाव समाधानकारक न मिळाल्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे.
तर लहान शेतकऱ्यांना पर्याय नसल्यामुळे कापूस विकावे लागत आहे, कापसाचा दर समाधान कारक न मिळाल्यामुळे शेतकऱ्याकडून नाराजीच्या सूर उमटताना दिसत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कापसाचे उत्पादन शेतकऱ्यांना परवडण्याजोगे आहे व यावर्षी पावसाने साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन सुद्धा समाधानकारक झालेले आहे, यामुळे दिवाळीनंतर बाजारामध्ये पांढऱ्या सोन्याची (कापूस) आवक वाढल्याचे दिसून येते. पण शेतकऱ्यांना मालाला भाव न मिळाल्यामुळे त्यांच्यात नाराजीचे वातावरण पसरले आहे.
केंद्र सरकारने कापसाच्या भावात ५०१ रुपयाची वाढ केली आहे पण शेतकऱ्यांना सरकारी कापूस बाजार न चालू झाल्यामुळे, खासगी बाजारात कापूस विकावा लागत आहे, या खासगी बाजारामध्ये हमीभावापेक्षा कमी भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
चंद्रपूर (सास्ती) : राजुरा तालुका पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मजूर…
अमरावती :- २० नोव्हेंबरला दोनच्या सुमारास ७५ वर्षीय वृद्धाचा मतदान करून घरी परतताना अपघातात मृत्यू…
गोंदिया (अर्जुनी मोरगाव) : घरात पतीचा मृतदेह असतांना, कुटुंबात दुःखाचे सावट सर्वत्र पसरलेले असतांना, जन्मदात्याचे…
गडचिरोली : निवडणूक कर्तव्यावर असलेले पोलिस पथक, निवडणूक कर्मचारी, अधिकारी हे रांगेत उभे असोत, किंवा…
बुलढाणा:- २० नोव्हेंबरला निवडणुकीचे कामानिमित्त २६८ बसेस राखीव ठेवण्यात आल्या होत्या , त्यामुळे दोन दिवस…
यवतमाळ:-१६ नोव्हेंबरला एका अल्पवयीन मुलीला आरोपीने पळवून नेल्यामुळे मुलीच्या काकानी खंडाळा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार…
This website uses cookies.