Gadchiroli

गडचिरोलीमधील एका पतीने चाकूने केले पत्नीवर लगातार वार, पत्नी गंभीर जखमी

गडचिरोली: हळदवाही येथे पतीने आपल्या पत्नीवर चाकूने लगातार वार केले. यात पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली . आरोपी महेश रूषी नैताम (२८) रा. दिभना, ता. गडचिरोली याला घोट पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी पती महेश नैताम हा दारू पिऊन येऊन पत्नीला मारझोड करायचा व शिवीगाळ करायचा. पतीच्या अशा त्रासदायक वागण्यामुळे महेशची पत्नी डिम्पल महेश नैताम ही आईवडिलांच्या घरी माहेरी हळदवाही येथे जाऊन राहत होती.त्यामुळे महेशपण सासुरवाडीला आला. आणि डिम्पलला तू सासरी का येत नाहीस, असे म्हणत संतापाने तिच्यावर चाकूने वार केला.

पत्नीच्या पोटावर, शरीरावर वार केल्याने पत्नी गंभीर जखमी झाली . त्यामुळे पोलिस मदत केंद्र घोट येथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पतीला ३ ऑक्टोबर रोजी अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Vidarbha Trends Team

Recent Posts

शेजारील व्यक्तीने आई व मुलाच्या अंगावर ज्वलनशील केमिकल टाकले

अमरावती:- पिंपळखुटा येथे बुधवार ला १२ वाजताच्या दरम्यान शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने झोपेत असलेल्या महिला व…

35 minutes ago

विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षीयपूर्ण केलेल्या, दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी सोय

चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…

15 hours ago

ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिस ठेवत आहेत नागरिकांवर लक्ष

गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…

15 hours ago

लाच मागणाऱ्या वरिष्ठ श्रेणी लिपिकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…

15 hours ago

यवतमाळमध्ये सकाळी ७ वाजता पासून तीन दिवस मतदान प्रक्रिया

यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…

19 hours ago

शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…

20 hours ago

This website uses cookies.