गडचिरोली: या जिल्ह्यातील देसाईगंज येथील कोरेगाव गावात चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात खलबत्ता मारून, तिचा खून करण्यात आला. व तिचा मृतदेह गावातील विहिरीत फेकला. स्नेहा लोकेश बाळबुद्धे असे मृत विवाहितेचे नाव आहे. तर लोकेश गुणाजी बाळबुद्धे असे तिच्या आरोपी पतीचे नाव आहे .
मिळालेल्या माहितीनुसार गुणाजी बाळबुद्धे हे शेतकरी आहेत.त्यांचा मुलगा लोकेश आपल्या पत्नीवर नेहमीच संशय घ्यायचा.यातून त्यांच्यात नेहमीच वाद होत होते.याच वादातून लोकेशने तिचा खून केला.
त्यानंतर लोकेशने तिचा मृतदेह खांद्यावर उचलून नेत गावातील विहिरीत फेकले.तेव्हा घरापासून विहिरीपर्यंत रक्ताचे थेंब पडलेले होते . त्यानंतर लोकेश बाळबुद्धे याने देसाईगंज येथील पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले .
स्नेहा व लोकेश यांचा एक मुलगा पहिलीच्या वर्गात असून दुसरा अवघ्या तीन वर्षांचा आहे. आई जीवानिशी गेली, वडिलांना अटक झाली, यामुळे ही निरागस भावंडे जन्मदात्यांच्या प्रेमाला पारखी झाली.
त्यानंतर पोलिसांनी स्नेहाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.यातील पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.