गडचिरोली : या जिल्ह्यामध्ये एका नक्षलधाम दाम्पत्त्याने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची बातमी समोर आली आहे .त्यांच्यावर आठ लाखांचे बक्षीस होते .असिन राजाराम कुमार (३७)व अंजू जाळे (२८)असे या दांपत्याचे नाव आहे .
ओडिशात माओवाद्यांच्या हिंसक चळवळीत काम करणाऱ्या दाम्पत्याने गडचिरोली पोलिसांपुढे १९ ऑक्टोबरला शरणागती पत्करली. त्यांच्यावर आठ लाखांचे बक्षीस होते. आंतरराज्य नक्षल दाम्पत्याच्या शरणागतीमुळे विविध हिंसक कारवायांचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
असिन राजाराम कुमार ऊर्फ अनिल ऊर्फ गगनदीप ऊर्फ निशांत ऊर्फ सुशांत (३७, रा. मंडीकला ता. नरवाना, जि. जिंद, हरयाणा) व अंजू सुळ्या जाळे ऊर्फ सोनिया ऊर्फ जनिता (२८, रा. गुरेकसा ता. धानोरा, जि. गडचिरोली), अशी त्यांची नावे आहेत.
असिन हा ओडिशात नक्षल चळवळीच्या प्रेस टीममध्ये एरिया कमिटी मेंबर म्हणून काम करायचा, तर अंजू ही याच दलममध्ये सदस्य होती. २०१८ पासून ते सुन्नी जि. शिमला (हिमाचल प्रदेश) येथे राहून नक्षलचळवळीसाठी काम करत.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.