गडचिरोली : या जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात अनधिकृत कर्मचारी नेमलेले असून ,रुग्णांच्या जीवाचा खेळ होत असल्याची बातमी समोर आली आहे. हा सगळा प्रकार अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू आहे.इथे गेल्या 18 वर्षापासून आरोग्य केंद्रात कधी डॉक्टर येतात तर कधी येत नाही .
वरून यात अनधिकृत कर्मचारी नेमण्यात आल्याने रुग्णांना तपासण्याचे व त्यांच्यावर उपचार करण्याचे काम तेच करतात.तर काही रुग्णांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते.या आरोग्य केंद्रात डॉक्टर राजेश मानकर हे वैद्यकीय अधीक्षक आहेत.ते गेल्या 18 वर्षापासून याच ठिकाणी आहेत .तर मानसेवी अधिकारी डॉक्टर संतोष नैताम हे देखील सात ते आठ वर्षापासून याच ठिकाणी आहेत.त्यांचे दोन खाजगी दवाखाने आहेत.
त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या अनेक रुग्णांना ते त्यांच्या खाजगी दवाखान्याकडे वळवत होते.या सगळ्या प्रकरणामुळे ,प्राथमिक आरोग्य केंद्रात जर असा गैरप्रकार होत असेल तर याची चौकशी केली जाईल.व त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे यांनी म्हटले आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.