गडचिरोली : या जिल्ह्यातील स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ५६ वर्षीय तलाठ्याने दोन अल्पवयीन चिमुकल्यांवर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे.
शंभू मुरारी आतला (५६)असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
आरोपीने प्रकृतीच्या कारणास्तव दोन वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. तो दुमजली घर बांधून पत्नीसोबत राहत होता.
त्याची पत्नी व मुले बाहेरगावी
गेले होते, तेव्हा तो एकटाच घरी राहत होता. दरम्यान घराजवळ अंदाजे सहा व नऊ वर्षे असलेल्या मुली खेळत होत्या. तेव्हा त्याने चॉकलेटचे आमिष दाखवून त्या मुलींना घरात नेले व त्यांच्यावर अत्याचार केले.
त्यानंतर धानोरा पोलिस ठाणे हद्दीत ही घटना उघडकीस आली.त्यानंतर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्यास बेड्या ठोकल्या आहे.