Gadchiroli

गडचिरोली जिल्ह्यात अंगावरून भरलेला ट्रक गेल्याने एक महिला जागीच ठार, तर चारजण गंभीर जखमी

गडचिरोली (कोरची ): गडचिरोली जिल्ह्यात दोन मोटारसायकलींची धडक झाल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या पाच जणांच्या अंगावरून लोहखनिज भरलेला ट्रक गेल्याची बातमी समोर आली आहे . यात एक महिला जागीच ठार, तर चारजण गंभीर जखमी झाले.
सेवाबाई रामसाय कोरेटी (३५, रा. दामेसरा, ता. कुरखेडा) असे मृत महिलेचे नाव आहे. रमशीला दसरू काटेंगे (३६, रा. दोडके, छत्तीसगड), माणिक नरेटी (२५, रा. गोठणपार, ता. देवरी, जि. गोंदिया), दर्शना माणिक हलामी (२२) व सोनम मडावी (२४) यांचा जखमींत समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गुरुवारी (दि. ७ नोव्हेंबर) तालुक्यातील बेळगावनजीकच्या कोसमी येथे घडली.

सेवाबाई कोरेटी व रमशीला काटेंगे या दोन बहिणी भाऊबीजेसाठी चिलमटोला येथील आपल्या माहेरी गेल्या होत्या. कोरचीचा आठवडी बाजार असल्याने त्या माणिक नरेटी या नातेवाईक युवकासमवेत मोटारसायकलने येत होत्या. कोसमी गावाजवळ दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली.

यामुळे पाचही जण खाली पडले. एवढ्यात समोरून सुरजागड लोहखाणीतून लोहखनिज घेऊन येणारा ट्रक (क्रमांक सीजी- ९७, एवाय १५३७) त्यांच्या अंगावरून गेला. या भीषण अपघातात सेवाबाई कोरेटी ही जागीच ठार झाली. उर्वरित चारजण गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पोलिसांनी ट्रक जप्त केला असून, ट्रकचालक फरार आहे. या अपघातातील दर्शना हलामी यासुद्धा भाऊबीजेसाठी नांदळी या माहेरगावी गेल्या होत्या. आपल्या गावाकडे परतत असताना त्यांचाही अपघात झाला. घटनेच्या वेळी कोरची येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेले आमदार कृष्णा गजबे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींबद्दल विचारपूस केली आणि संबंधितांना आवश्यक सूचना केल्या. दरम्यान, सुरजागड येथून लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीने मृत महिलेच्या आणि जखमींच्या परिवारांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे.

Vidarbha Trends Team

Recent Posts

तरुणाने लग्नापूर्वी ठेवले शरीरसंबंध

अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…

4 months ago

तरुणीवर दोघांनी केला अत्याचार

अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…

4 months ago

मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…

4 months ago

घराघरांवर क्युआर कोड लावले

अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…

4 months ago

रेशनच्या ई – केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…

4 months ago

विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा

यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…

4 months ago

This website uses cookies.