गडचिरोली : या जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात अस्थी विसर्जन करून परत येताना ,अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीत ,नातेवाईकाच्या अस्ती विसर्जन करून गावाकडे परत येताना ,हा अपघात झाला.
ही घटना गडचिरोली-चामोर्शी महामार्गावरील कुनघाडा रै, फाट्यापासून २०० मीटर अंतरावर शुक्रवार, ११ ऑक्टोबर रोजी रात्री ७:३० वाजेच्या सुमारास घडली.
प्रेमशहा ज्ञानशहा अलाम (५०) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे ,तर प्रतापशहा ज्ञानशहा अलाम (५२)(रा. गिलगाव) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.जखमी झालेल्या व्यक्तीला चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
हे दोघे भाऊ एम.एच. ३३ के. ३४८६ क्रमांकाच्या दुचाकीने नातेवाइकाच्या अस्थी विसर्जनासाठी मार्कडादेव येथे गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपून गावाकडे परत येत असतानाच कुनघाडा रै. फाटा परिसरात अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेचा अधिक तपास चामोर्शी येथील पोलीस करीत आहेत.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.