गडचिरोली : या जिल्ह्यामध्ये बोदली जंगल परिसरात एका गुरख्याने आपल्या हिमतीच्या जोरावर वाघाशी दोन हात केल्याची बातमी समोर आली आहे.
यादव जराते असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कुऱ्हाड व काठीच्या भरवशावर त्याने हा हल्ला परतून लावला.मिळालेला माहितीनुसार यादव जराते हे अनेक वर्षंपासून गुरे ढोरे चराईचे काम करतात.
त्यांच्याजवळ असलेल्या जनावरांसोबत ते इतर लोकांचे पण गुरे राखतात, त्यासाठी नेहमीप्रमाणे ते गुरे चराईसाठी बोधले गावापासून काही अंतरावर असलेल्या जंगलात गेले होते.तेव्हा वाघाने यादव जराते यांच्यावर मागून हल्ला केला.या हल्ल्यात यादव यांच्या पाठीवर व मांडीवर वाघाच्या पंजाचे ओरखडे पडले.
वाघाने यादव यांची मान पकडली नाही त्यामुळे ते थोडक्यात बचावले, तेव्हा त्यांनी हातात असलेल्या कुऱ्हाडीने स्वतःचा बचाव केला. परंतु यात ते जखमी झाले, आता सध्या त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.