गडचिरोली: गडचिरोली येथील मूलचेरा तालुक्यातील लक्ष्मीपुर या गावात मुलीने तिच्या प्रियकरासोबत गळफास घेऊन आत्महत्या केली होती .आता याच मुलीच्या वडिलांनी सुद्धा आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे .जयदीप सिमरन मंडल (२०,रा. लक्ष्मीपूर), अमेला अमित रॉय (१८,रा. विजयनगर ) यांच्यात प्रेम संबंध होते .त्यामुळे 5 ऑक्टोबरला दोघेही अर्ध्या रात्रीतून घरातून पळून गेले होते. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतले असता ते आढळले नाही. परंतु लक्ष्मीपूर शिवारात एका शेतकऱ्याच्या झोपडीत या दोघांनी एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले.
यादरम्यान या घटनेची माहिती अमेलाचे वडील अमित अनिल रॉय (४२) यांना मिळाली ,त्यानंतर दुपारपासून त्यांनी त्यांचा मोबाईल बंद केला .आणि ते गायब झाले, नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला परंतु ते सापडले नाही .शेवटी मुलचेरा ठाण्यात ते बेपत्ता असल्याचे नोंद करण्यात आले.
अखेर ७ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांचा मृतदेह जंगलात आढळून आला. त्यांनी जंगलामध्ये एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती .त्यांच्या मोबाईलच्या शेवटच्या लोकेशन मुळे त्यांचा शोध पोलिसांना घेता आला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणात त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहेत