Gadchiroli

गडचिरोली येथील एका अपघातात मृत्यू झालेल्या मृतदेहाला पाठविल्यावर लगेच झाला दुसरा अपघात..

गडचिरोली : गडचिरोली येथील मूलचेरा या गावात अपघातात मृत्यू झालेल्या मृतदेहाला ,दवाखान्यात पाठवल्यानंतर ,तिथून परत येताना आणखी दुसरा अपघात पोलिसांपुढेच झाल्याची बातमी समोर आली आहे ,मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी लगाग मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत राधाकांत पुलीन मंडल हा ठार झाला .

या अपघातानंतर आष्टी मूलचेरा व अहेरीचे पोलीस तेथे आले व पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला .

त्यानंतर मुलचेरा येथील पोलीस तिथून परत येत असतांना मूलचेरा-आष्टी मार्गावरील रेंगेवाही गावाजवळील वळणावर एटापल्लीहून आष्टीकडे निघालेल्या मालवाहू जीपने (एमएच ३४ बीझेड- ७३७२) आइस्क्रीमचा बॉक्स घेऊन दुचाकीवरून (एमएच ३३ डी- ०४१३) मूलचेराकडे निघालेल्या प्रणय रामचंद्र निमरड (१९, रा. गोंडपिंप्री, जि. चंद्रपूर) यास उडवले. यात तो ठार झाला.

या घटनेनंतर मूलचेरा पोलिसांनी पंचनामा करून प्रणय चा मृतदेह तपासणीसाठी पाठवला व एटापल्ली येथे राहणाऱ्या श्रीकृष्ण दीपक मोहरले या जीप वाहन चालकाला ताब्यात घेतले व पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Vidarbha Trends Team

Recent Posts

विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षीयपूर्ण केलेल्या, दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी सोय

चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…

12 hours ago

ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिस ठेवत आहेत नागरिकांवर लक्ष

गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…

12 hours ago

लाच मागणाऱ्या वरिष्ठ श्रेणी लिपिकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…

12 hours ago

यवतमाळमध्ये सकाळी ७ वाजता पासून तीन दिवस मतदान प्रक्रिया

यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…

16 hours ago

शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…

17 hours ago

हरभऱ्याच्या पिकात जंगली रानडुकरामुळे शेतात रात्रभर जागरण

अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…

18 hours ago

This website uses cookies.