अमरावती :- शुक्रवारला संध्याकाळच्या वेळेस गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अभ्यास चोरट्यांनी ३०.५८० ग्राम वजनाचे दोन मंगळसूत्र चोरी केले, व एका चोरट्यांनी १.५६ लाख रुपयाचे किमतीची चैन चोरी केली या घटनेची नोंद रात्री गाडगेनगर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना ८ नोव्हेंबरला सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान कठोरा नाका रोडवर शिवार्पण कॉलनीतील मेडिकल जवळ घडली. तक्रारदार महिला ही आपल्या दोन बहिणी सोबत दिवाळी करिता मावशीकडे आल्या होत्या. या तिघीही बहिणी अंबादेवीचे दर्शन करून आटो ने शिवार्पण कॉलनीमध्ये आल्या, त्या तिघीही ऑटोतून खाली उतरल्यावर त्यातील एक बहिण समोरील दुकानांमध्ये काही सामान घ्यायचे होते.
तर ती सामान घेण्यासाठी दुकानात गेली.व दोघ्या बहिणी तिथेच रोडावर उभ्या राहिल्या त्या रस्त्याने दोन युवक तोंडाला रुमाल बांधून दुचाकीने आले व काही काळायच्या आत गळ्यातील मंगळसूत्र चोरी करून पळ काढला, याप्रकरणी या तिघी महिलांनी त्वरित गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून अज्ञात आरोपी विरुद्ध रात्री १० वाजता गुन्हा दाखल केला.
मंदिरातून येतांना लगेच एका तासानंतर त्याच परिसरामध्ये ८ नोव्हेंबरलाच ७:३० च्या सुमारास त्याच परिसरामध्ये राहणारी महिला ही मंदिरातून हरिपाठ करून वापस येत होती, ती महिला एका घरासमोर उभी होती मागेहुन दोन दुचाकीस्वार तोंडाला रुमाल बांधून आले व महिलेच्या गळ्यातली सोनसाखळी हिसकावून फरार झाले, या दोन्ही घटनांमध्ये कमीत कमी एका तासाच्या अंतर होता या महिलेने रात्री ११ ला त्वरित गाडगे नगर पोलीस स्टेशन गाठून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.पोलिसांनी या दोन्ही घटनेची दखल घेत पुढील तपास सुरू केली.
वर्धा:- सायबर फसवणुकीपासून सावधान रहा असे आवाहन जिल्हा पोलीस व सायबर सेल विभागाने केले आहे,…
चंद्रपूर (सास्ती) : राजुरा तालुका पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मजूर…
अमरावती :- २० नोव्हेंबरला दोनच्या सुमारास ७५ वर्षीय वृद्धाचा मतदान करून घरी परतताना अपघातात मृत्यू…
गोंदिया (अर्जुनी मोरगाव) : घरात पतीचा मृतदेह असतांना, कुटुंबात दुःखाचे सावट सर्वत्र पसरलेले असतांना, जन्मदात्याचे…
वाशिम :- खाजगी बाजारामध्ये पांढरा सोन्याची आवक वाढल्याचे दिसून येत आहे यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात…
गडचिरोली : निवडणूक कर्तव्यावर असलेले पोलिस पथक, निवडणूक कर्मचारी, अधिकारी हे रांगेत उभे असोत, किंवा…
This website uses cookies.