गोंदिया: या जिल्ह्यामध्ये एका तरुणाचा आधार कार्ड व पॅन कार्ड घेऊन त्याचा ईमेल आयडी हॅक करून आणि दुसऱ्या तरुणाचा बोगस क्रेडिट कार्ड बनवून, आरोपींनी सहा लाख वीस हजार रुपयांचे कर्ज घेतल्याची बातमी समोर आली आहे.
सालेकसा तालुक्यातील ग्राम
हेटीटोला येथील सागर भागवत बागडे या तरुणाचा मोबाईल व ईमेल आयडी हॅक करून त्याचे उत्पन्न जास्त दाखवून आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड चुकीच्या पद्धतीने तयार करून आरोपींनी सहा लाख 26 हजार रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाच्या रकमेतून आरोपींनी सोने व इतर साहित्य खरेदी केले. पण बिल मात्र विजय कोरे यांच्या नावाने तयार केले .
त्यामुळे आमगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असून ,आमगाव न्यायालयाच्या आदेशावरून १३ आरोपींवर भादंवि कलम ४२०, ४२३, ४६४, ४७१, ३४ माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ सी, ६६ ड अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक तिरुपती राणे करीत आहेत.