गोंदिया : या जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या तिरोडा येथील निवासस्थानातून साडेचार लाखांची चोरी झाल्याची घटना घडली आहे . ही घटना रात्रीच्या दरम्यान ७ नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिलीप बन्सोड हे अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातून विधानसभेची निवडणूक लढवित असल्याने ते यांच्या अर्जुनी-मोरगाव येथे सध्या वास्तव्यास आहेत. त्यांनी तिरोड्याच्या शहीद मिश्रा वॉर्डातील घराला कुलूप लावून ते गेले असताना घरी कुणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात चोरी केली.
मिळालेल्या माहितीनुसार दिलीप बन्सोड यांच्या तिरोड्याच्या शहीद मिश्रा वॉर्डातील राहत्या घरून ७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या घराचे कुलूप तोडून पहिल्या मजल्यावरील बेडरूममधील लाकडी आलमारीचे लॉकर तोडून .दोन नग सोन्याच्या साखळ्ळ्या १४ ग्रॅम वजनाच्या किमत ५२ हजार ५०० रुपये, एक सोन्याचे मंगळसूत्र १० ग्रॅम वजनाचे किमत ३५ हजार, दोन वजन २० ग्रॅम वजनाच्या किंमत ७० हजार, एक नग सोन्याची नथ १० ग्रॅम वजनाची १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील रिंग किंमत ३५ हजार, २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र किंमत लाख ५० हजार रुपये रोख असा सोन्याच्या बांगड्या किंमत ३५ हजार, ७० हजार असा दीड लाख रुपये रोख व २ लाख ९७ हजार ५०० रुपयांचे दागिने असा एकूण ४ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या घटनेसंदर्भात बन्सोड यांचे ड्रायव्हर सोमप्रकाश फुलचंद बिसेन (४२) रा.
ठाणेगाव यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४), ३०५ (अ) अन्वये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक अमित वानखडे करीत आहेत.
पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या भेटी
माजी आमदार तथा अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे उमेदवार दिलीप बन्सोड यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलिस अधिकारी साहील झरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे व तिरोडा येथील ठाणेदार अमित वानखेडे यांनी घटनास्थळाला थेट दिली. त्यातील मौका चौकशी करून हे अधिकारी परतले.
चोरी झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरी फिंगर प्रिट घेतले आणि श्वानालाही पाचारण करण्यात आले होते.