गोंदिया:या जिल्ह्यातील नवेगाव बांध पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम जब्बर खेडा येथील जंगल शिवारात एका महिलेने आत्महत्या केली. देवांगना रामकृष्ण मडावी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे .ही महिला 55 वर्षाची होती .
मिळालेल्या माहितीनुसार देवांगना मडावी शेतात धान कापणीचे काम करण्यासाठी घरून निघाली होती .परंतु त्या दिवशी ती घरी परतलीच नाही .तिचा शोध घेतला असता तिचा पत्ताही लागला नाही.
मात्र काही दिवसांनी जब्बारखेडा जंगल शहरात झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला.
मात्र सोमवारी सायंकाळी ४:३० वाजता जब्बारखेडा जंगल शिवारात झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला.
या घटनेसंदर्भात दुर्योधन रामकृष्ण मडावी (३५, रा. धाबेटेकडी) यांच्या तक्रारीवरून नवेगावबांध पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास फौजदार अनंतराम तुलावी करीत आहेत.