गोंदिया : या जिल्ह्यामध्ये दुचाकीवर केलेली स्टंटबाजी एकाच्या जिवावर बेतल्याची बातमी समोर आली आहे.लोकेश राघोबा कापगते असे मृत तरुणाचे नाव आहे, हा तरुण 22 वर्षाचा होता,सडक-अर्जुनी या तालुक्यात असलेल्या भुसारीटोला येथील हा रहिवासी होता.तर तुलसीदास हेमराज कुरसुंगे (३२, रा. डव्वा)
असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्टंटबाजी करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकून हा अपघात झाला.आणि झालेल्या या अपघातात तरुणाला नाहक जिवाला मुकावे लागले. यात आरोपी हा दुचाकीवर स्टंटबाजी करीत होता. तेव्हा दुचाकी क्रमांक एमएच ३५-एके ९८३०
चालवून हातवारे करून जोरजोराने ओरडत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला त्याने धडक दिली.
यात समोरच्या दुचाकीवरील लोकेश कापगते या तरुणाचा मृत्यू झाला.त्यानंतर
या घटनेसंदर्भात डुग्गीपार पोलिसांनी राजकुमार मुनेश्वर परसमोडे (२४, रा. भुसारीटोला) याच्या तक्रारीवरून आरोपी तुलसीदास कुरसुंगे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६ (१), १२५ (ए) सहकलम १८४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. व यातील पुढील तपास पोलिस हवालदार इस्कापे करीत आहेत.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.