गोंदिया: या जिल्ह्यामध्ये पेट्रोलिंग वर असलेल्या पोलिसांनी ट्रॉली बॅगमध्ये गांजा घेऊन जात असताना एका तरुणाला पकडल्याची बातमी समोर आली आहे .मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी गांजा व अन्य सामानासोबत एकूण आठ लाख 68 हजार 630 रुपयांचा माल जप्त केला आहे.
रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध धंदे, गुन्हेगार शोध, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना, त्यांना रेलटोली मालधक्का परिसरात रेल्वे स्टेशन कडून हनुमान मंदिराकडे एक तरुण ट्रॉली बॅग सह संशयास्पद स्थितीत दिसून आला .पथकाने त्याला थांबवून चौकशी केली असता ,त्याने आपले नाव सतीश दीनानाथ उपाध्याय असे सांगितले.हा तरुण पंचवीस वर्षाचा असून तो तिलवारा घाट जिल्हा जबलपूर -मध्यप्रदेश मध्ये राहणार आहे.
पोलिसांनी त्याच्या ताब्यातून दोन ट्रॉली बॅग, एक सॅक बॅग जप्त केली असून, त्यात १४ पाकिटे दिसून आली व त्यात २८ किलो १२० ग्रॅम गांजा मिळून आला. या प्रकरणातील आरोपी भोला प्रकाश यादव (२०, रा. तिलवाराघाट) हा फरार झाला आहे. या दोन्ही आरोपींवर रामनगर पोलिसात एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २०, २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्ग- दर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संजय तुपे यांनी केली आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.