गोंदिया : या जिल्ह्यात दिग्गज नेत्यांच्या जंगी सभामुळे प्रचारामध्ये रंगत येणार आहे. त्यासोबतच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आता पुढच्या टप्प्यात ती गुरुवारी तिरोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार यांची तर शुक्रवारी गोंदिया येथे भाजपचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची सभा होणार आहे. या प्रचार सभांमधून आता तोफ डागली जाणार आहे. यासाठी प्रमुख पक्षांकडे स्टार कॅम्पेनरच्या सभांची मागणी झाली आहे. काही नेत्यांच्या सभा निश्चित झाल्या आहेत. तर काही नेत्यांच्या सभा ऐनवेळी निश्चित होण्याची शक्यता आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया
पार पडून चिन्ह वाटप झाल्यानंतर निवडणूक रिंगणात असलेल्या ६४ उमेदवारांनी प्रचार कार्याला सुरुवात केली आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या प्रमुख उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी दिग्गज नेत्यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या वतीने गोंदियासाठी प्रियांका गांधी यांच्या सभेची मागणी पक्षाकडे करण्यात आली आहे. याबरोबरच काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रताप गढी, कन्हय्या कुमार, उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह यांची मागणी करण्यात आलेली आहे. तर महाविकास आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून खा. शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्या सभेची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे.
तर महायुतीतील भाजपकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेची मागणी केली आहे. गुरुवारी तिरोडा येथे खा. शरद पवार यांची महाविकास आघाडीचे उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा होत आहे.
तर शुक्रवारी गोंदिया येथे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची सभा होणार आहे. यानंतर पुढील दोन-तीन दिवसात आणखी काही दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.