गोंदिया: गोंदिया येथील देवरी पोलिसांनी रायपुरहून नागपूरकडे गांजा घेऊन जाणाऱ्या कारला पकडले. शिरपूरबांध येथील सीमा तपासणी नाक्याजवळ शनिवारी (दि. ५) रात्री ८:३० चे दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी २४ पाकिटांत असलेला १२० किलो गांजा पकडला असून, त्याची किमत
त्याची किमत ३ लाख ६० हजार रुपये सांगितली जाते.
रायपूरकडून येत असलेल्या वाहनातून गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती देवरी पोलिसांना मिळाली होती.माहितीच्या आधारे पोलिसांनी लगेच शिरपूर येथील सीमा तपासणी नाक्यावर नाकाबंदी केली. यामध्ये तेथे येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करूनच त्यांना पुढे सोडले जात होते.
हा प्रकार बघून चालकाने वाहनाची गती वाढवली व तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना संशय येताच त्यांनी सापळा रचून कारला पकडले. या कारमध्ये दोन व्यक्ती होते. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, डिक्कीत २४ पाकिटांत १२० किलो ओला गांजा सापडला. या गांजाची बाजारातील किंमत ३ लाख ६० हजार रुपये सांगितली जाते.
काही दिवसांपूर्वी सुद्धा असाच प्रकार घडला होता ,त्यामुळे गांज्याची ही तस्करी छत्तीसगडमधून होत आहे , आणि यामध्ये एखादी टोळीच सक्रिय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे .
पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली आली असून, या प्रकारानंतर आता देवरी पोलिस सावध झाले आहेत.पोलिसांनी गांजा, कार व मोबाइल जप्त केले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील, सहकारी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.