गोंदिया : बँक कर्मचाऱ्याने
लोनधारकाकडून किश्तचे
पैसे घेऊन ते बँकेत न भरता पैसे अफरातफर केले .एक लाख ७७ हजार ५०६ रुपयांनी बँक कर्मचाऱ्याने अफरातफर केली. हा प्रकार गोंदिया येथील आशीर्वाद मायक्रो फायनान्स बँकेत घडला आहे. १३ सप्टेंबर २०२३ ते २ जानेवारी २०२४ दरम्यान हा प्रकार सुरू होता .
आरोपी आकाश महादेव ठाकरे (२६, रा. लाला लजपतराय वॉर्ड, भंडारा) हा आशीर्वाद मायक्रो फायनान्स बँकेच्या येथील राणी अवंतीबाई चौक येथील शाखेत फिल्ड ऑफिसर पदावर काम करीत होता. त्याने १३ सप्टेंबर २०२३ ते २ जानेवारी २०२४ दरम्यान बँकेच्या लोनधारकांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून किश्तचे एक लाख ७७ हजार ५०६ रुपये घेतले व बँकेत जमा न करता बैंक व लोनधारकांची फसवणूक केली.
बँकेकडून ऑडिट करण्यात आले असता बँक कर्मचाऱ्याचा हा प्रकार उघडकीस आला. फिर्यादी एरिया मॅनेजर फरीद करीम शेख (३२, ह. मु. भंडारा) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवी कलम ४०६, ४२० अंतर्गत बँक कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंद केला आहे.