गोंदिया :या जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ,तथा दवनीवाडा येथील पोलिसांच्या पथकांनी, रेती चोरी करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी अलग अलग ठिकाणी छापे मारून त्यांना पकडले. या प्रकरणांमध्ये 67 लाख 93 हजार पाचशे रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे .
यात पाच व्यक्तींना ट्रॅक्टर ट्रॉली सोबत तर दोन व्यक्तींना रेतीने भरलेल्या टिप्पर सोबत पकडले गेले आहे.या प्रकरणातील आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
या प्रकरणामध्ये आरोपी पलास राधेश्याम ठाकरे (25), आशीष ईश्वरीलाल चौधरी (26), आमप्रकाश ईश्वरीलाल चौधरी (25) तथा मनीष दीनदयाल पटले (25) तथा टिप्पर चालक आरोपी पाटीलटोला (मुंडीकोटा) तहसील तिरोड़ा जिल्हा गोंदिया येथील प्रवीण अनिल कटनकार (25) , ग्राम गराडा तहसील तिरोड़ा येथील यशोराज दिलीप चनाप (22) ,यांच्याविरुद्ध कलम 303(2), 3 (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आले.
तसेच देवरी तहसील तिरोड़ा येथील आरोपी मनीष धनेंद्र ठाकरे (22) यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई पुलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पुलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या आदेशावरुन करण्यात आली.