चंद्रपूर :या जिल्ह्यात राज्यातील 18 शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयासोबत ,चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात ,अत्याधुनिक हेल्थ एटीएम बसवण्यात येणार आहे. या हेल्थ एटीएम द्वारे एकूण 60 प्रकारच्या चाचण्या केल्या जाणार आहे.
शरीर तपासणीसाठी 15 प्रकारच्या चाचण्या उपलब्ध होतील .
यात ड्राय बॉडी मास इंडेक्स, रक्तदाब, चयापचय पृष्ठ, शरीरातील चरबी, हायड्रेशन, हृदय गती, उंची, स्नायूंचे प्रमाण, शरीराचे तापमान, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण, वजन अशा एकूण ६० चाचण्या केल्या जाणार आहेत. शरीर तपासणीसाठी १५ प्रकारच्या चाचण्या तत्काळ उपलब्ध होतील. याद्वारे जलद चाचणी, लघवी चाचणी, गर्भधारणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, मलेरिया, टायफॉइड, एचआयव्ही, ग्लुकोज, हिमोग्लोबिन, लिपिड प्रोफाइल आदी चाचण्या करण्याचीही सुविधा आहे.
या तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णाला,त्याचा मोबाईल क्रमांक किंवा ईमेल टाकल्यास संपूर्ण अहवाल मिळेल .या मशीनमुळे रुग्णाचा अहवाल काही सेकंदात उपलब्ध होणार आहे .आरोग्य एटीएममधून आवश्यक त्या सूचनाही मिळतील. व यात या वायफाय सुविधाही उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.