मुल (चंद्रपूर) : चंद्रपूर येथील मूल शहरामध्ये दुचाकी बाजूला हटविण्याच्या वादातून चुलत भावाच्या मुलाची हत्या केल्याची खळबळक जनक बातमी समोर आली आहे.
या घटनेतील प्रेम चरण कामडे असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुल येथील पंचशील वार्डात नरेंद्र कामडे व बबन कामडे यांचे कुटुंब राहते.हे दोघेही चुलत भाऊ आहेत. या दोघांमध्ये रस्त्यावरील दुचाकी बाजूला करण्यासाठी वाद सुरू झाला .या वादातून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले.
यादरम्यान नरेंद्र कामडे यांच्या पत्नी मनीषा कामडे हिने थेट चंद्रपुरातील गुंडांना फोन केला, व त्यांना मुल शहरात बोलवले.चंद्रपूरच्या पठाणपुरा वार्डातील आरोपी राजेश खनके, सचिन खनके, वैभव महागावकर, कपील गेडाम, श्रीकांत खनके (२८) हे पाच जण एम.एच. ३४ ए. ए.४४२४ क्रमाकांची कार घेऊन बबन कामटे गांच्या घरी आले.त्यातील मुख्य आरोपी नरेंद्र कामडे व मनीषा कामडे या दोघांनी चुलत भाऊ बबन्न कामडे यांच्याशी पुन्हा वाद घातला त्यावेळी चंद्रपुरातून आलेल्या गुंडांनी बबन कामडे यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला .
यादरम्यान त्यांना वाचवण्यासाठी प्रेम कामडे हा अल्पवयीन मुलगा समोर आला.त्यामुळे गुंडांनी त्याच्यावरच चाकूने वार केला.आणि यात प्रेमचा जागीच मृत्यू झाला .या प्रकरणांमध्ये
पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .व त्यांना अटक करण्यात आले आहे.